Friday , April 17 2026
Breaking News

मराठी केंद्र शाळा मच्छे येथे शिवजयंती उत्साहात साजरी

Spread the love

 

बेळगाव : मच्छे येथील मराठी केंद्र शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. उपस्थितांचे स्वागत व पाहुण्यांचा परिचय सहशिक्षक शेळके सर यांनी करून दिला. तर वक्त्यांचा परिचय प्रशांत नांदोडकर यांनी करून दिला. शाळेचे मुख्याध्यापक कडांगळें सर, शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष गजानन छप्रे, तसेच उपाध्यक्ष मोहिनी बाळेकुंद्री व सर्व सदस्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. शिवमुर्तीचे पूजन कार्यक्रमासाठी वक्ते म्हणून लाभलेले श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालयाचे माजी अध्यक्ष बजरंग धामणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर श्रीफळ परशराम कोलेकर यांनी वाढवले.
धामनेकर यांनी यावेळी शिवपूर्व काळ व त्यावेळची परिस्थिती तसेच शिवरायांचे बालपण त्यांची दुर्गनीती, जलनिती, शिवरायांचे गुणवर्णन त्यांना लाभलेला संत सहवास, गनिमी कावा, रयतेचे केलेले संघटन, मराठी भाषे विषयक केलेले कार्य व आजच्या घडीला छत्रपती शिवरायांचे विचार त्यांची नीती विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये कशी अंगीकारावी याबद्दल त्यांनी शिवचरित्रातील अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
तसेच शाळेचे कन्नड विषयाचे शिक्षक भरते हितलकेरी यांनी शिवरायांच्या अनेक गुणांचे वर्णन करून आजच्या घडीला शिवरायांचे विचार विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये कसे प्रभावी ठरतात यावर फार छान असे विचार मांडले.
यावेळी बऱ्याच विद्यार्थ्यांची भाषणे झाली. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमातून मुलांनी विविध वेशभूषा करून शिवचरित्रावरील अनेक प्रसंग सादर केले. व उपस्थितांची मने जिंकली. शेरलेकर मॅडम यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले .
या कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक, शिक्षिका तसेच विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

महिलांच्या राजकीय सक्षमीकरणाबाबत जागरूकता तसेच 33% महिलांना आरक्षण हेच भाजपचे ध्येय : माजी खासदार मंगला अंगडी

Spread the love  बेळगाव : नारी शक्ती फोरमच्या वतीने “नारी शक्ती वंदन अधिनियम” निमित्त महिलांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *