Sunday , July 26 2026
Breaking News

आर. एल. लॉ कॉलेजच्या आठ विद्यार्थ्यांची दिवाणी न्यायाधीशपदी निवड

Spread the love

 

बेळगाव : बेळगावमधील नामांकित केएलएस राजा लखमगौडा विधी महाविद्यालयाच्या आठ विद्यार्थ्यांनी कर्नाटक न्यायिक सेवा परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांची दिवाणी न्यायाधीश म्हणून निवड झाली असून, त्यांच्या या कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

न्यायाधीशपदी निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये मौनेश बडिगेर, नवीन कोपार्डे, हळ्याळप्पा, प्रियांका राजगोळकर, जगदीश कित्तूर, श्रेया उत्तूरे, विजयकुमार बुद्री आणि नागराज तळवार यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर राज्यस्तरीय परीक्षेत यश मिळवून बेळगावचे नाव उज्ज्वल केले आहे. विद्यार्थ्यांचे हे यश त्यांच्या सातत्यपूर्ण अभ्यासाचे, कष्टाचे आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांनी केलेल्या योग्य मार्गदर्शनाचे फळ आहे. भविष्यातील कायदेतज्ज्ञ घडवण्यासाठी आमची संस्था कटिबद्ध असल्याचे या यशामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, अशी प्रतिक्रिया महाविद्यालय प्रशासनाने व्यक्त केली. कर्नाटक लॉ सोसायटीचे अध्यक्ष पी. एस. साहुकार, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष ए. के. तगारे, महाविद्यालय नियामक मंडळाचे अध्यक्ष आर. एस. मुतालिक, प्राचार्य डॉ. ए. एच. हवालदार आणि सर्व सदस्यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *