नवी दिल्ली : नवी दिल्ली येथील इंदिरा भवन येथे आयोजित ओबीसी काँग्रेस महिला राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या हस्ते पार पडले. या अधिवेशनास देशभरातून अनेक महिला प्रतिनिधींनी आपला सहभाग नोंदविला. या अधिवेशनादरम्यान खानापूरच्या माजी आमदार, एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी देखील सहभाग घेतला होता. या अधिवेशनादरम्यान ओबीसी समाजातील महिलांचे सशक्तिकरण, राजकारणातील सहभाग आणि सामाजिक न्याय या विषयांवर डॉ. अंजली निंबाळकर यांनी आपले मत मांडत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या अधिवेशनादरम्यान डॉ. अंजली निंबाळकर यांच्या भाषणाला काँग्रेसचे नेते आणि प्रतिनिधींनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. ओबीसी समाजातील महिलांचे सशक्तिकरण यावर आपले परखड मत मांडत काँग्रेसच्या राष्ट्रीय स्तरावर डॉ. अंजली निंबाळकर यांनी आपली विशेष छाप उमटवली आहे. या अधिवेशनाला देशभरातील महिला पदाधिकारी, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अधिवेशनात ओबीसी समाजाच्या महिलांच्या प्रश्नांवर चर्चा करून त्यांना राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अधिक संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta