खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका हा अतिपावसाचा तालुका, त्यातच घनदाट जंगलाने व्यापलेला तालुका अशी खानापूर तालुक्याची ओळख आहे. मात्र खानापूर तालुका वाळू मिश्रीत जमिनीचा असल्याने केवळ भात आणि ऊस ही केवळ दोनच पिके घेतात.
या ऊस पिकाला मात्र जंगली प्राण्यांची तसेच आगीची भय असूनही तालुक्यातील शेतकरी धाडसाने भात पिकांबरोबर ऊसाचे पिक घेतात.
या ऊसाच्या पिकामागे सध्या विद्युत ताराच्या होणाऱ्या घर्षणाने आगी लागण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत.
त्यामुळे शेतकरी वर्गालाही डोकेदुखीच आहे. हेस्काॅम खात्याकडून शेतकरी वर्गाला शिवारात विजपूरवठा केला जातो. शेतात शेतकरी वर्गाला ऊसाला पाण्याची व्यवस्था व्हावी. या उद्देशाने वीजपुरवठा केला आहे. यावेळी वीजपुरवठा व्हावा. म्हणून विद्युत खांब उभारले जातात. यावेळी हेस्काॅम खात्याकडून विद्युत खांब उभारताना विद्युत खांब सरकू नये. म्हणून विद्युत खांबाला जमिनीतुन तार जोडली जाते. त्यामुळे विद्युत खांब सरकत नाही व तारा लोंबकळणार नाही. याची खबरदारी हेस्काॅम खात्याने घेतली असुन मात्र शेतकरी जमिनीतील तारा जोत काम करताना अडचण होते म्हणून काढुन विद्युत खांबाला गुंडाळून ठेवतात. त्यामुळे विद्युत खांब वाकला जातो. आणि विद्युत तारा लोंबकळतात. याच तारा वाऱ्यामुळे एकमेकावर घासल्या जातात. घर्षणाने स्पार्कींग होऊन ठिणगी पडते. व ऊसाला आग लागली जाते. जर शेतकरी वर्गाने शेतातील विद्युत खांबाचे संरक्षण केले तर तारा लोंबकळणार नाहीत व दुर्घटना होणार नाही. तेव्हा प्रत्येक शेतकऱ्याने शिवारातील विद्युत खांब, विद्युत तारा याची काळजी घ्यावी, असे आवाहन खानापूर हेस्काॅमच्या अभियंत्या सौ. कल्पना तिरवीर यांनी केले.
गेल्या महिण्याभरात तालुक्यातील गणेबैल, गंदिगवाड, कोडचवाड त्याचबरोबर नुकताच करंबळ आदी गावच्या शिवारात आगीच्या दुर्घटनांनी ऊसाचे लाखाचे नुकसान झाले.
भविष्यात अशा आगीच्या दुर्घटना होऊ नये. यासाठी शेतकरीवर्गाने शिवारातील विद्युत खांबाची काळजी घेणे महत्वाचे आहे.
आगीच्या दुर्घटनेत जळालेल्या ऊसाला नुकसानभरपाई मिळण्यासाठी हेस्काॅम खात्याकडूनही प्रयत्न केले जाते. व जळालेल्या ऊसाच्या टक्केवारीनंतर शेतकरीवर्गाला रक्कम मिळू शकते, असेही हेस्काॅम खात्याकडून कळविण्यात येते.
तेव्हा शेतकरीवर्गाने विद्युत खांब, विद्युत ताराची काळजी घेणे ही काळाची गरज आहे.
Check Also
बेळगाव येथे होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार!
Spread the love खानापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या बैठकीत निर्णय खानापूर : बेळगाव येथे येत्या 26 …