खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या विद्यानगर येथील विकासकामाकडे नगरपंचायतीचे साफ दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे विद्यानगरतील नागरिकांतून कमालीची नाराजी पसरली आहे.
याबाबतची माहिती अशी की, खानापूर शहराचा विस्तार वाढत चालला आहे. त्यामुळे नविन वसाहतीही वाढल्या आहेत. मात्र नगरपंचायतीकडून विकासाचा पत्ताच नाही.
विद्यानगर हे बसस्थानकापासून जवळ आहे. शिवाय मलप्रभा क्रीडांगण, बीईओ कार्यालय, सरकारी पदवी कॉलेज सर्वच गोष्टींची सोय आहे. मात्र विद्यानगर वसाहतीत गटारी नाहीत, रस्त्याचा पत्ताच नाही. त्यातच डुक्करांची वाढती संख्या यामुळे येथील नागरिकांचे जगणे मुष्कील झाले आहे. विद्यानगर वसाहतील नागरिक वेळेत घरपट्टी, दिवापट्टी, पाणीपट्टी भरतात. याचे उत्पन्न नगरपंचायतीला मिळते. मग विकासकामे का होत नाही? असा सवाल विद्यानगर वसाहतीतील नागरिकांतून विचारला जात आहे.
तरीही नगरपंचायतीचे नगरसेवक गप्पच आहेत. यामागचे गौडबंगाल काय? असा सवाल विद्यानगर वसाहतीतील नागरिकांतून चर्चीला जात आहे. तेव्हा खानापूर नगरपंचायतीने व नगरसेवकांनी विद्यानगर वसाहतीतील विकासकामाना चालना द्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
Check Also
बेळगाव येथे होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार!
Spread the love खानापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या बैठकीत निर्णय खानापूर : बेळगाव येथे येत्या 26 …