खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराचा विस्तार गेल्या दहा वर्षात झपाट्याने वाढला. लोकवस्ती वाढली. शहराच्या कार्यक्षेत्रात उपनगरे वाढली.
त्यामुळे खानापूर शहरात कचरा, पाणी, पथदिप अशा अनेक समस्या खानापूर शहरातील नागरिकांना सतावत आहेत.
खानापूर शहरातील मुख्यत्वे करुन कचरा प्रश्न मोठा गंभीर आहे. याला जबाबदार मुख्य खानापूर शहरवासीच आहेत. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे लक्ष्मीनगरातील खानापूर बस आगारा मागील लक्ष्मीनगरचा रस्ता व तेथील कोपरा.
याठिकाणी या भागातील नागरीक दररोज घरातील कचरा प्लॅस्टीक पिशव्यातून भरून रस्त्याच्या बाजूला असलेल्या कोपर्यावर फेकून देतात. टाकलेल्या कचर्याचे काय होईल. त्याचा योग्य विल्हेवाट होईल की नाही? असा विचार करत नाहीत.
त्यामुळे लक्ष्मीनगरातील बस आगारामागील कोपर्यावर कचरा नेहमीच साचलेला असतो.
कित्येक वेळा नगरपंचायतीचे स्वच्छता अधिकारी सकाळी उभे राहून कचरा टाकण्यास विरोध करतात. मात्र कोणी नसले तर कचरा टाकून जातात.
त्यामुळे नगरपंचायत सुध्दा लक्ष्मीनगरातील कचर्यापुढे हात टेकत आहे.
येथे कचरा टाकणार्यावर कारवाई केली जाईल, असे फर्मान काढले तरी आजपर्यंत येथे नागरिक कचरा टाकतच आहे.
Check Also
बेळगाव येथे होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार!
Spread the love खानापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या बैठकीत निर्णय खानापूर : बेळगाव येथे येत्या 26 …