खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरासह व तालुका अंतर्गत येणाऱ्या खानापूर कोर्टपासून शांतीसागर हॉटेलपर्यंत दोन्ही बाजूच्या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात कचरा आहे. त्यामुळे गांधी नगर, हुडको कॉलनी, हलकर्णी, हिंदूनगर ग्रामस्थ व या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना या रस्त्यावरील कचऱ्यामुळे व दुर्गंधीमुळे त्रास होत आहे. शिवाय या कचऱ्यामुळे माणसांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच खानापूरच्या सौंदर्याला ही बाधा निर्माण झाली आहे. तसेच जांबोटी क्रॉसपासून पारिश्वाड क्रॉस पर्यंतच्या रस्त्यातही अशीच परिस्थिती आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला ठिक ठिकाणी कचरा साचला आहे. खानापूर शहराच्या हद्दीत येणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट खानापूर नगरपंचायतीने लावावी, अशा मागणीचे निवेदन खानापूर नगरपंचायतीचे चिफ ऑफिसर बाबासाहेब माने यांना देण्यात आले. तर हलकर्णी ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या रस्त्या आजूबाजूच्या कचऱ्याची विल्हेवाट हलकर्णी ग्राम पंचायतीने लावावी यासाठी हलकर्णी ग्राम पंचायतीला ही यासंबंधीचे निवेदन देण्यात आले आहे.
निवेदन देताना खानापूर तालुका विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष भरमाणी पाटील, तसेच अमोल मन्नोळकर, सुरेश खानापुरे, रवि मादार, श्रीनिवास मादार, लक्ष्मण चेचडी, नामदेव उत्तुरकर, यल्लाप्पा नलवडे आदीसह अनेक नागरिक व आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta