खानापूर (प्रतिनिधी) : करंबळ (ता. खानापूर) गावचे प्रसिद्ध ग्राम दैवत धोंडदेव यात्रेला मंगळवारी दि. २२ पासुन प्रारंभ झाली.
दरवर्षा प्रमाणे सकाळी गावातील विविध देवदेवतांची मानकरीच्याहस्ते विधीवत पूजा होणार.
त्यानंतर डोंगरावरील धोंडदेवाची मानकरी, पंचमंडळी, ग्रामस्थ याच्या उपस्थित विधिवत पुजा, ओटी भरणे, गार्हाणा घालणे आदी कार्यक्रम होऊन महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे.
बुधवारी दि २३ रोजी यात्रेनिमित्त मनोरंजन, खेळ, आदी कार्यक्रम आयोजित करण्यात येणाार आहेत.
धोंडदेव यात्रेला करंबळ माहेरवासीन मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवितात. तसेच करंबळ गावच्या पंचक्रोशीतील विविध गावाचे भाविक मोठया संख्येने उपस्थित राहतात.
दोन दिवस धोंडदेव यात्रा पार पडणार आहे.
Check Also
खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती
Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …