खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर सरकारी दवाखान्यात आरोग्य अधिकार्याचे बनावट शिक्के व सही वापरून संध्या सुरक्षा पेन्शन योजनेचा लाभ देणार्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गजाआड केले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वासु गुरव रा. मेंडेगाळी ता. खानापूर व सरकारी दवाखान्यातील कर्मचारी इस्माईल बिडीकर यांनी मिळून हे कृत्य केले आहे. या दोघांच्या विरोधात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय नांद्रे यांनी खानापूर पोलिस स्थानकात तक्रार केली आहे. या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.
सरकारच्या संध्या सुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील 60 वर्षावरील नागरिक कागदपत्रे मिळविण्यासाठी धडपडत असतात. याचा फायदा घेत तालुक्यात खेडोपाडी अशी कामे करणार्या एजंटाची संख्या वाढली आहे. अशाच प्रकारे शनिवारी एजंट वासु गुरव हा सरकारी दवाखान्याच्या आवारात फिरत होता. या संशयावरून कर्मचारी वर्गाने त्याच्याकडे विचारणी केली असता. त्याच्याजवळ असंख्या संध्या सुरक्षा योजनेचे अर्ज आढळून आले. लागलीच त्याची कसुन चैकशी करताच त्याने सरकारी दवाखान्याचा कर्मचारी इस्माईल बिडीकर हा बनावट शिक्के व सही करून देत असल्याची माहिती उजेडात आली.
लागलीच खानापूर पोलिसांना पाचारण करून दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्यांच्याजवळील शिक्के जप्त करून त्यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे व त्यांना गजाआड केले.
Check Also
खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती
Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …