खानापूर : बेळगाव तालुक्या नंतर खानापूर समितीत एकी व्हावी अशी भावना सगळीकडे व्यक्त होत असताना माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या बैठकीत एकीसाठी त्रिसदस्यीय कमिटी नियुक्त करण्याचा निर्णय झाला आहे. या कमिटीने 10 मार्च पूर्वी एकीची प्रक्रिया पूर्ण करावी असे देखील ठरवण्यात आले आहे.
मंगळवारी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक झाली 2013 साली महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तिकिटावर आमदार पद भोगून भाजप प्रवेश केला आहे. त्याकाळी असा आमदार निवडून आणल्याबद्दल दिगंबर पाटील यांनी खानापूर तालुक्यातील मराठी जनतेची माफी मागितली हा ठराव देखील बैठकीत मांडला.
सध्या खानापूर तालुका समितीमध्ये एकी करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती करण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला. या त्रिसदस्यीय समितीमध्ये डी. एम. भोसले, शिवाजीराव पाटील आणि आबासाहेब दळवी यांचा समावेश आहे. दहा मार्च पूर्वी त्यांनी एकीची प्रक्रिया राबवावी असे देखील ठरवण्यात आले.
समितीच्या पुढील रणनीती ठरवण्यासाठी 14 मार्च रोजी एक व्यापक बैठक घेण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला. आमदार अरविंद पाटील यांनी भाजप प्रवेश करून सीमा लढ्यातील हुतात्म्यांचा अवमान केला आहे यासाठी त्यांच्या निषेधाचा ठराव देखील समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
माजी आमदार अरविंद पाटील यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर खानापूर तालुक्यातील वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले असून समितीत एकीचे वारे वाहू लागले आहेत. दिगंबर पाटील यांनी नियुक्त केलेली त्रिसदस्यीय कमिटी एकीसाठी काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Check Also
खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती
Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …