मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान खानापूर यांच्यावतीने सामान्य ज्ञान प्रज्ञाशोध परीक्षांचे आयोजन
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव देत सामान्य ज्ञान वाढविण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षांचा सराव होण्यासाठी येथील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान खानापूर यांच्या वतीने सामान्य ज्ञान प्रज्ञाशोध परीक्षांचे आयोजन मराठी भाषा दिनानिमित्त करण्यात आले होते. या परीक्षेमध्ये मराठा मंडळ ताराराणी हायस्कूल खानापूरच्या विद्यार्थिनींनी भरघोस यश संपादन केले आहे. सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक हा कुमारी नेहा गावडू कदम, द्वितीय क्रमांक संचिता शरद पाटील व श्वेता राजू बेडरे. तृतीय क्रमांक निकीता चंद्रकांत परवी, चौथा क्रमांक सुप्रिया चांगदेव पाटील या विद्यार्थिनींनी यश संपादन करून शाळेचा व मराठा मंडळाचा नावलौकिक वाढविला आहे. या विद्यार्थिनींना मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती राजश्रीताई हलगेकर (नागराजू) व संचालक मंडळ यांचे प्रोत्साहन मिळाले असून शिवाजीराव शे. पाटील व परशराम आण्णा गुरव यांची शाबासकी मिळाली आहे. शाळेचे मुख्याध्यापक राहूल. एन. जाधव, शाळेचे शिक्षक पी एल तरळे आणि शाळेचा संपूर्ण शिक्षक वर्ग यांचे विविध विषयांवर मौलिक मार्गदर्शन लाभले. सर्व विद्यार्थिनींचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Check Also
खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती
Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …