Tuesday , March 3 2026
Breaking News

मणतुर्गा शिवारात आढळले वाघाच्या पावलांचे ठसे

Spread the love

खानापूर : मणतुर्गा (ता. खानापूर) शिवारात वाघाच्या पावलांचे ठसे आढळून आल्याने परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. वनखात्यानेही शिवारात आढळलेले ठसे वाघाचे असल्याचे स्पष्ट केल्याने गांभीर्य वाढले आहे. मणतुर्ग्याजवळील जंगलात स्थानिक शेतकऱ्यांना वाघाच्या डरकाळ्या ऐकू आल्या होत्या. पण, वाघाने शिवाराच्या दिशेने कधी मोर्चा वळवला नव्हता.
चार दिवसांपूर्वी गावापासून काही अंतरावर असलेल्या मिरचीच्या शिवारात वाघाच्या पावलांचे ठसे आढळून आले आहेत. काही शेतकऱ्यांना हे ठसे आढळले. याची माहिती तात्काळ वनखात्याला देण्यात आली. वनाधिकाऱ्यांनी पाहणी करुन ठसे वाघाचे असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे, या परिसरात वाघांचा संचार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. वाघाचा वावर स्पष्ट झाल्याने परिसरातील ऊस उत्पादक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *