Sunday , September 8 2024
Breaking News

आम आदमी पार्टीचे कम्प्युटर उतारासंदर्भात खानापूर तहसीलदाराना निवेदन

Spread the love


खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीतून कम्प्युटर उताऱ्यासंदर्भात नेहमीच शेतकरीवर्गाना, सामान्य नागरिकांना आडचण होत आहे. कम्प्युटर उतारा मिळणे कठीण होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला कर्ज काढताना, शेतीच्या कामासाठी कॅप्यूटर उतारा वेळेत मिळत नाही. त्यामुळे सर्व जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.
ही समस्या सोडविण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने व आम आदमीचे उत्तर कर्नाटक प्रसार प्रमुख राजकुमार टोपणावर याच्या मार्गदर्शनाखाली खानापूर तालुक्याचे दंडाधिकारी प्रविण जैन याना आम आदमी पार्टीचे खानापूर तालुका अध्यक्ष भैरू पाटील यांच्या हस्ते निवेदन सादर केले. यावेळी दंडाधिकारी प्रविण जैन यांनी निवेदनाचा स्विकार करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी आम आदमी पार्टीच्या वतीने तालुक्यातील शिक्षकाच्या रिक्त जागा, तसेच येत्या शैक्षणिक वर्षात अतिथी शिक्षक तसेच तालुक्यातील शेतकरी वर्गाला मिळणारे नुकसान भरपाई आदी विषयावर चर्चा करण्यात आली.

निवेदन देताना आम आदमी पार्टीचे अध्यक्ष भैरू पाटील, सचिव शिवाजी गुजीकर, खजिनदार मोहन मळीक, उपाध्यक्ष चंद्रु मेदार, बळीराम खणूकर, प्रभाकर पाटील, रमेश कौंदलकर, महांतेश बसकोड, लबीब शेख, प्रल्हाद पाटील, रामू दोडमणी, रामू आवणे, महादेव देसाई, राघवेंद्र मयेकर, गोपाळ गुरव, जोतिबा कुंभारआदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

गर्लगुंजी विभागीय क्रीडा स्पर्धेत गणेबैल हायस्कूलचे घवघवीत यश

Spread the love    खानापूर : गर्लगुंजी तालुका खानापूर विभागीय माध्यमिक शाळा क्रीडा स्पर्धा नुकत्याच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *