Sunday , September 20 2026
Breaking News

संकेश्वरात मुलांचा शिमगा चालू…

Spread the love


संकेश्वर (प्रतिनिधी) : उद्या गुरुवार दि. १७ रोजी हुताशनी पौर्णिमा होळी असल्यामुळे आज संकेश्वरात मुले-मुली युवक सार्वजनिक होळीसाठी टिमक्यांच्या निनादात घरोघरी जाऊन शिमगा करीत शेणकूट लाकडे, सरपण आणि देणगी गोळा करतानाचे चित्र पहावयास मिळाले. शेतकरी कुटुंबातील घरांत शेणकूट, सरपण तर मोजक्याच घरांत लाकडे सार्वजनिक होळीसाठी मिळताना दिसली. प्रत्येकाच्या घरात आज स्वयंपाक गॅस, इलेक्ट्रीक शेगडी असल्यामुळे लोकांनी शिमगा करणाऱ्या मुलांना पैसे देऊन सार्वजनिक होळीसाठी सहकार्य करतानाचे दृश्य पहावयास मिळाले. संकेश्वरातील बसवान गल्लीत सार्वजनिक होळीचा मोठा थाट असतो, कमतनूर वेसीत कोंबडा सोडून होळी साजरी करण्याची प्रथा आहे. अंकली वेस, नदी गल्ली, मठ गल्ली तसेच गावात ठिकठिकाणी सार्वजनिक होळीची जय्यत तयारी चाललेली दिसत आहे.
बोंबाबोंब थांबवा- गल्लो-गल्लीत सार्वजनिक होळीसाठी घरोघरी चंदा मागण्यांसाठी आलेल्या मुलांची कानठळ्या बसविणारी बोंब थांबविण्यासाठी लोक लगबगीने शेणकूट, लाकडे पैसे देतानाचे चित्र सर्वत्र पहावयास मिळाले. टिमक्यांचा आवाज आणि मुलांची कानठळ्या बसविणारी बोंब लोकांना उद्याच होळी असल्याची आठवण करून देणारी ठरली.

About Belgaum Varta

Check Also

गणेशोत्सवासाठी यमकनमर्डी पोलिसांकडून गणेश मंडळाना मार्गदर्शक सूचना : पीएसआय आर. बी. पाटील

Spread the love  मंडप, मिरवणूक व विसर्जनावेळी नियमांचे पालन करण्याचे आवाहन दड्डी वार्ताहर.. आगामी गणेशोत्सवाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *