Tuesday , March 3 2026
Breaking News

सिंगीनकोपात पांडुरंग सप्ताहाला प्रारंभ

Spread the love


खानापूर (प्रतिनिधी) : सिंगीनकोप (ता. खानापूर) येथे सालाबादप्रमाणे यंदाही श्री पांडुरंग सप्ताहाला सोमवारी दि. २८ पासून प्रारंभ झाला. सोमवारी सकाळी ध्वजारोहण होऊन उत्सवाची सुरूवात झाली. तर हभप पुंडलिक पांचगे यांच्याअध्यष्ठानाखाली ज्ञानेश्वरी ९ वा व १२ वा अध्ययाचे सामुदायिक वाचन करण्यात आले.
त्यानंतर ईदलहोंड, अंकले, निट्टूर, गणेबैल, काटगाळी, खेमेवाडी, निडगल, गर्लगुंजी गावचे सांप्रदायिक भजन होऊन चापगांव गावच्या श्री बाल भजनी मंडळाचा भारूडाचा कार्यक्रम पार पडला.
उद्या मंगळवारी दि. २९ रोजी पहाटे काकड आरती, पंचवटी होऊन सकाळी ८ वाजता सिंगीनकोप गावातून श्रीच्या पालखीचा दिंडी सोहळा होऊन दुपारी १२ वाजता महाप्रसादाने श्री पांडुरंग सप्ताहचा सांगता सोहळा होणार आहे, तरी भाविकानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सोमवारी दि. ४ एप्रिल रोजी सिंगीनकोप गावचे ग्रामदैवत श्री कलमेश्वर देवतेची यात्रा आयोजित करण्यात आली आहे. सोमवारी दुपारी करडी मजल व भजनाच्या नादात गावातून देवीची पालखी व आंबील गाडे कलमेश्वर मंदिरकडे प्रयाण होणार आहेत.
मंगळवारी दि. ५ रोजी सकाळी ७ वाजता मानकऱ्यांच्याहस्ते पिंडीचा अभिषेक, त्यानंतर इंगळ्याचा कार्यक्रम होऊन दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन होणार आहे. तरी भाविकानी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिंगीनकोप गावच्या पंच कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *