


खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील चिगुळे येथील माऊली सेवा समितीच्या सदस्याना चिगुळेतील काही नागरिक धमकावुन गावात दहशत घालत आहेत. मंदिरात प्रवेश करण्यास मज्जाव करत आहेत. अशा चिगुळेतील १७ जणांवर कारवाई करावी. अशा मागणीचे निवेदन तहसीलदार प्रविण जैन व सीपीआय सुरेश सिंगे याना नुकतेच देण्यात आले.
निवदेनात म्हटले आहे की, संबंधित १७ नागरिक गावच्या मंदिरात प्रवेश करण्यास विरोध करत आहेत. गावच्या सार्वजनिक मैदानावर मुलाना खेळण्यास मज्जाव करत आहेत. तसेच घरे जाळुन टाकण्याची धमकी देत आहेत. सनाच्या दिवसात शस्त्रे घेऊन दहशत माजवीत आहेत. तसेच भिवा चोर्लेकर यांनी म्हटले आहे की, यातील सात जणानी आपल्यावर बहिष्कार टाकला असून लग्न समारंभासाठी सार्वजनिक भांडी व साहित्य भाड्याने देण्यास नकार दिला. तसेेच मंदिरात प्रवेश देण्यास नकार दिला आहे. लग्नकार्यात देवीला श्रीफळ अर्पण करणे, गाऱ्याणे घालण्यास बंदी घालणे. याशिवाय लग्न समारंभास कोणीही जाऊ नये, अशी फतवा काढुन नाहक त्रास देण्यात येत आहे, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी गावचे नागरिक उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार प्रविण जैन व सीपीआय सुरेश सिंगे यांनी निवेदन स्विकार करून न्याय देऊ असे आश्वासन दिले.
Belgaum Varta Belgaum Varta