खानापूर (प्रतिनिधी) : बेकवाड (ता. खानापूर) ग्राम पंचायत हद्दीतील खैरवाड ग्रा. पं. सदस्य रूक्माणा झुंजवाडकर यांचे सोमवारपासुन तालुका पंचायतीच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू होते.
रोजगार हमी योजनेअंतर्गत कामात यांत्रिक आवजाराचा वापर करून रोजगार हमी योजनेचा गैरवापर करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर बोगस जाॅबकार्ड करून निधीचा दुरूपयोग केल्याची माहिती उजेडात आली आहे.
सरकारने गरीब जनेतच्या हाताला कामे मिळावी. त्या गरीब जनतेला पोट भरावे. या उद्देशाने रोजगार हमी योजना सुरू केली आहे.
मात्र बेकवाड ग्राम पंचायतीचे पिडीओची नागापा बन्नी व ग्राम पंचायत अध्यक्ष यल्लापा गुरव यांनी मनमानी करून गावच्या अरण्य विभागातील सर्वे नंबर २१ मधील १० लाखाचे बंधारा दुरूस्तीचे खडीकरणाचे काम हाती घेतले आहे.
संबंधित काम स्थानिक ग्राम पंचायत सदस्याना व सदस्यांना विश्वासात न घेता तसेच घरी बसणाऱ्या आपल्या मर्जीतील मजुराचे जाॅब कार्ड देऊन परस्पर निधी हडप केल्याचा केल्या प्रकरणी तसेच जेसीबी लावून काम केल्याची तक्रारी वरून आंदेलन दोन दिवस सुरू होते.
यावेळी आंदोलनाला विविध संघटनांनी पाठींबा दर्शविला. तसेच माजी आमदार दिगंबर पाटील, समितीचे नेते मुरलीधर पाटील, प्रकाश चव्हाण, बाळासाहेब शेलार, आबासाहेब दळवी, अभिलाष देसाई, के. पी. पाटील आदीनी आंदोलनस्थळी भेटून पाठिंबा दिला.
यावेळी तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी राजेश धनवाडकर यांनी आंदोलनकर्त्याची भेट घेऊन बेकवाड पिडीओ नागाप्पा बन्नी यांची अन्यत्र बदलीचे आश्वासन दिले.
तसेच कामात जेसीबी, यंत्राचा वापर केल्याचे सुनावणीत ऍड.
अकाश अथणीकर बाजू मांडली.
त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. तेेव्हा तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी राजेश धनवाडकर यांनी याची चौकशी होताच कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी ग्राम पंचायत सदस्य रूक्माणा झुंजवाडकर, सदस्या नुतन भुजंगराव तसेच रोजगार कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
बेळगाव येथे होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार!
Spread the love खानापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या बैठकीत निर्णय खानापूर : बेळगाव येथे येत्या 26 …