
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या रूमेवाडी क्रॉसवरील अग्नीशमन दलाच्या सेवा सप्ताहाला प्रारंभ गुरूवारी दि. 14 एप्रिलपासून सुरू झाला.
अग्नीशमन दलाचा सेवा सप्ताह गुरुवार दि. 14 एप्रिल ते दि 20 एप्रिल पर्यंत होणार आहे.
गुरूवारी दि. 14 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधुन सेवा सप्ताहाला प्रारंभ झाला.
14 एप्रिल 1944 साली मुंबई येथील बंदरात बोटीचा स्फोट होऊन बचावकार्यात मुंबईच्या अग्निशमन दलाच्या अधिकर्यांना वीरमरण मिळाले. तोच दिवस 14 एप्रिल ते 20 एप्रिलपर्यत सेवा सप्ताह साजरा केला जातो. तर 14 एप्रिल रोजी हुतात्मा दिन म्हणून देशभरात अग्नीशमन दलाच्या वतीने साजरा केला जातो.
सर्व जनतेला याची आठवण राहावी म्हणून सेवा सप्ताहमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
यावेळी खानापूर अग्नीशामक ठाण्याचे ठाणा अधिकारी मनोहर राठोड यांच्याहस्ते पुष्पचक्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी खानापूर अग्नीशमन दलाचे जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta