Saturday , July 27 2024
Breaking News

सौंदलगा येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती साजरी

Spread the love


सौंदलगा : सौंदलगा येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सौंदलगा ग्रामपंचायतमध्ये ग्राम विकास अधिकारी अशपाक शेख यांनी सर्वांचे स्वागत केले. ग्रा.पं. अध्यक्षा अर्चना कोगनोळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यानंतर विनोद कांबळे यांनी बुद्धवंदना गायिली. यावेळी ग्रा. पं. सदस्य प्रकाश कांबळे, दादासाहेब कोगनोळे यांनी आपल्या मनोगतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सांगितले. यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्षा, ग्रा. पं. सदस्य, सदस्या माजी ता. पं. सदस्य, यासह कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्राम चावडीमध्ये तलाठी एस. एम. पोळ यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा, उपाध्यक्षा, सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती येथील बहुजन समाजाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. सुरुवातीला प्रास्ताविक व स्वागत माजी ग्रा. पं. अध्यक्ष दादासाहेब कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू मेस्त्री यांनी केले. यावेळी दीपप्रज्वलन केशव मेस्त्री, पुंडलिक कांबळे, नागोजी मेस्त्री, आनंदा यादव, दत्ता ऐवाळे यांच्याकडून करण्यात आले. यानंतर महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन संग्राम पाटील यांनी तर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन अमर सुतार यांनी केले. यावेळी आर्या मेस्त्री, आदी मेस्त्री, माधुरी मेस्त्री, विरा मेस्त्री यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, समाजातील सर्व माता भगिनी व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
याबरोबरच मध्यवर्ती झेंडा चौक येथे माजी ग्रा. पं. अध्यक्ष पुंडलिक भेंडुगळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर माजी एपीएमसी सदस्य शशिकांत पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला. यानंतर उपस्थित बहुजन समाजाच्या वतीने बुद्धवंदना गायीली. यावेळी शशिकांत पाटील, संजय पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाळासाहेब चव्हाण यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

शेतकरी वाहनांना टोल माफी मिळावी

Spread the love  रयत संघटनेची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *