
खानापूर : खानापूर तालुक्यातील करीकट्टी, कक्केरी येथे आयोजित करण्यात आलेल्या ज्योती कार्यक्रमाचा डॉ. सोनाली सरनोबत यांनी दीपप्रज्वलनाने शुभारंभ केला. यावेळी बोलताना डॉ. सोनाली सरनोबत यांनी गावातील लोकांशी चर्चा करून समस्या लवकरात लवकर दूर केल्या जातील असे आश्वासन दिले.
मंदिराच्या पुर्नबांधणीसाठी नियती फाउंडेशनवतीने निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
या कार्यक्रमाला केएमएफचे संचालक बेळगाव श्री. प्रकाश यु. अंबोजी, दयानंद चोपडे, बसवराज कडेमानी, ईश्वर सानिकोप्प, नागेश रामाजी, मंजुनाथा अंबोजी, बाबू देगावी, जत्रा समितीचे सदस्य आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta