खानापूर (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसापासून तालुक्यासह खानापूरात झालेल्या मुसळधार पावसाने थैमान घातले. यामुळे मलप्रभा नदीला पूर आला. मलप्रभा नदीच्या काठी असलेल्या खानापूर पोलिस ट्रेनिग सेंटरला मलप्रभा नदीच्या पाण्याने वेढा घातला. त्यामुळे ट्रेनिग सेंटरमधील लोकाना, कुटुंबाना पाण्याबाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानाना पाचारण करण्यात आले व बोटीच्या सहाय्याने त्यांना पाण्याबाहेर काढण्यात आले.
तालुका प्रशासनाने जागरूकता दाखवून वेळीच बाहेर काढल्याने अनर्थ टळाला.
Belgaum Varta Belgaum Varta