
खानापूर (प्रतिनिधी) : हलशी (ता. खानापूर) येथील मराठी शाळेच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याचे औचित्य साधुन गुरूवारी दि. २१ रोजी आयोजीत करण्यात आलेल्या मुला, मुलीच्या मॅरेथॉन स्पर्धेत १०० धावपटूनी सहभाग घेतला होता.
मॅरेथॉन स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय कब्बडीपटू मारूती देवापा देसाई होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून तोपिनकट्टी श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर, तालुका विकास आघाडी अध्यक्ष भरमाणी पाटील, नामदेव पाटील, मोहन पाटील, नारायण पाटील, यल्लापा नलवडे, चंद्रकांत पाटील, एसडीएमसी अध्यक्ष सुभाष हट्टीकर, गणपती पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कार्याध्यक्ष अनिल देसाई एक्सआर्मी खेळसंकलन खानापूर, किरण देसाई, उपस्थित होते.
मुलामुलींच्या मॅरेथॉन स्पर्धेत पहिली ते दहावी पर्यंत मुलानी भाग घेतला होता.
पहिली ते चौथी पर्यंत गटात प्रथम समर्थ घाडी, व्दितीय श्रेयस देसाई, तृतीय सुशीलकुमार पाटील तर मुलीच्या गटात प्रथम नागुली घाडी, व्दितीय प्रेरणा कदम, तृतीय दिशा पाटील, तसेच पाचवी ते सातवी गटात मुले प्रथम पांडुरंग झुंजवाडकर, व्दितीय नारायण भालकी, तृतीय सुरज घाडी, मुलीच्यात प्रथम प्रिती कदम, व्दितीय सरीता पाटील, तृतीय श्रध्दा सौदागर, तर आठवी ते दहावी गटात प्रथम खिराप्पा पाटील, व्दितीय समर्थ पाटील, तृतीय सुजह पाटील, तर मुलीच्या गटात प्रथम वैशाली गुरव, व्दितीय सोनल जोगण्णावर, तृतीय श्रध्दा पाटील यांनी यश संपादन केले.
यावेळी परीक्षक म्हणून क्रीडाशिक्षक कमलाकांत पाटील, फोडू पाटील, तसेच मिलींद देसाई, उमेश देसाई आदीनी काम पाहिले.
मुख्याध्यापक एल. डी. पाटील, एस. डी मधाळे, एस. व्ही. माळवी, एस. आर. पाटील आदी शिक्षक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta