Thursday , June 4 2026
Breaking News

श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य जयंती दि. ६ मे रोजी उत्सवाचे आयोजन

Spread the love

बेळगाव : श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य जयंती दि. ६ मे रोजी असून श्री चिदंबर देवस्थान, चिदंबर नगर येथे त्यानिमित्त उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य जयंती उत्सवाचे दि. १ ते ६ मे या कालावधीत श्री चिदंबर देवस्थान चिदंबर नगर येथे श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य जयंती उत्सव समितीतर्फे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. एक ते सहा मे या कालावधीत दररोज श्री चिदंबर देवस्थानात धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सकाळी आठ ते साडे नऊ वेळेत रुद्राभिषेक आणि महापूजा करण्यात येईल.
ता. 6 मे रोजी सकाळी साडे अकरा पासून स्तोत्र पठण, पुष्पार्चन, प्रवचन, मंगळारती, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी पाच ते साडे सहा या वेळेत विविध भगिनी मंडळे भजन आणि स्तोत्र पठण करणार आहेत.
सायंकाळी साडे सहा ते साडे सात या वेळेत श्री शंकर तत्वज्ञानावर आधारित श्री चंद्रशेखर शास्त्री जोशी यांचे प्रवचन होणार आहे. याशिवाय जयंतीच्या कालावधीत भक्तांना लघुरुद्रभिषेक,महापूजा, अन्न संतर्पण महापोषक अशी सेवा करता येईल, असे श्रीमद जगद गुरू शंकराचार्य जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष चंद्रशेखर शास्त्री जोशी यांनी कळविले आहे. भक्तांनी अधिक माहितीसाठी मंदीरात संपर्क साधावा.

श्रीमद् जगद गुरू शंकराचार्य जयंतीचे औचित्य साधून एक मे रोजी दुपारी चार वाजता श्री चिदंबर देवस्थान, चिदंबर नगर येथे श्रीमद् जगद गुरू शंकराचार्य कृत स्तोत्र पठण, वाचन स्पर्धेचे बालवाडी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजन करण्यात आले आहे. बालवाडी ते पहिलीच्या विद्यार्थ्यासाठी शिवपंचाक्षर स्तोत्र पठण, वाचन स्पर्धा आहे. दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांना निर्वाण षटक वाचन किंवा पठण करायचे आहे. पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शिवमानस पूजा स्तोत्र पठण, वाचन करायचे आहे. वेदसार शिवस्तोत्र आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना पठण, वाचन करायचे आहे. अधिक माहितीसाठी प्रा.संजीव कुलकर्णी, मोबाईल ९४४९५२९३९३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

कोर्ट परिसर आहे की दारूचा अड्डा; जिल्हाधिकारी लक्ष देतील का?

Spread the love  बेळगाव : न्यायदानाचे पवित्र केंद्र मानल्या जाणाऱ्या कोर्ट परिसरातच मद्यपान करून बाटल्या इतरत्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *