Wednesday , March 4 2026
Breaking News

पारीश्वाड येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा

Spread the love


खानापूर (प्रतिनिधी) : पारीश्वाड (ता. खानापूर) येथे बुधवारी दि. 27 रोजी सकाळी शिशू अभिवृद्धी योजना खानापूर मलप्रभा स्त्रि शक्ती स्वसहाय्य संघ बँक सोसायटी खानापूर, पारीश्वाड ग्राम पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर राष्ट्रिय महिला दिनाच्या निमित्ताने स्त्री शक्ति समावेश कार्यक्रम सरकारी हायर प्रायमरी शाळा पारीश्वाड येथे पार पडला.
यावेळी कार्यक्रमात पौष्टीक आहार शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्या शिबाराचे उद्घाटन आमदार आंजलीताई निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत अध्यक्षा गुलशेरा मुनावल्ली उपस्थित होत्या. या यावेळी गरोदर महिलांचा श्रीमंती कार्यक्रम करण्यात आला. यावेळी मुलांचे व महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमाला ग्राम पंचायत विस्तीर्ण अधिकारी श्रीमती लीलावती करलिंगन्नावर तसेच ग्राम पंचायत समितीचे सदस्य परिसरातील नागरिक तसेच सीडीपीओ राममुर्ती, तालुक्यातील अंगणवाडी सेविका स्वसहाय्य संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे स्वागत खानापूर शिशू अभिवृद्धी योजनाधिकारी राममूर्ती यांनी केले तर सूत्रसंचालन नागेंद्र चौगुले यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *