Saturday , October 19 2024
Breaking News

हब्बनहट्टीत श्रीकृष्ण मंदिराचे थाटात उद्घाटन

Spread the love

खानापूर : येथील हब्बनहट्टी गावात श्रीकृष्ण मंदिराचे थाटात आणि उत्साहात उद्घाटन करण्यात आले. जवळपास तीन दिवस हब्बनहट्टी गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी तिसऱ्या दिवशी नाटक समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गुरुवर्य आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी आणि डॉ. गणपत पाटील उपस्थित होते.

यावेळी गावकऱ्यांच्या हस्ते आणि परशुरामभाऊ नंदिहळ्ळी आणि डॉ. गणपत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. गणपत पाटील म्हणाले की, हब्बनहट्टी गावातील नागरिक एकत्रित येऊन हा श्री कृष्ण मंदिराच्या उद्घाटनाचा समारंभ उत्साहात पार पडला त्यामुळे मी त्यांचे अभिनंदन करतो. आपली भारतीय संस्कृती टिकून राहायचे असेल तर आपल्या सर्वांनी अशाच प्रकारे एकत्रित येणे गरजेचे आहे. आपल्या भारतात देवी-देवतांना खूप महत्त्व आहे. देवी-देवतांच्या आशीर्वादामुळेच आज आपण येथे आहोत. आपल्या वयोवृद्धांसाठी सर्व तरुणांनी आपल्या संस्कृतीचा आदर्श घ्यावा आणि आपली हिंदू संस्कृती टिकून ठेवावी, असे आवाहन केले.

याप्रसंगी माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळ्ळी, अनु गावडे, संतोष कदम, सोमाजी भरणकर, बाबुराव भरणकर, पुंडलिक पाटील, मनोहर पाटील, सत्यदेव नाईक, निंगाप्पा बळगी, बबन देवळी, दत्ताराम घाडी, रविंद्र गुरव, पुंडलिक नाकाडी, नींगो गवस यांच्यासह देवस्की पंच मंडळी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर येथे उद्यापासून राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा

Spread the love  बेळगाव : तोपीनकट्टी श्री महालक्ष्मी ग्रुप एज्युकेशन सोसायटीच्या शांतिनिकेतन पदवीपूर्व महाविद्यालयाच्या प्रांगणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *