खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने उद्या सोमवार दिनांक 23 मे रोजी जीवनावश्यक वस्तूंचे दर कमि करणे, अत्यावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे सोमवारी तहसीलदाराना निवेदन दिले जाणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने खाद्य पदार्थांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
त्यामूळे दैनंदिन खर्चाचे अंदाज पत्रक कोलमडले आहे. शिक्षक भरतीत मराठी माध्यमावर झालेला अन्याय त्वरित दूर करावा व सातवी उत्तीर्ण होऊन आठवीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्वरित बस पास उपलब्ध करून द्यावेत व शाळांना सुरुवात झाल्याने बसव्यवस्था मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावी, या विविध विषयांवर खानापूर तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी व खानापूर आगारप्रमुख यांना उद्या सोमवार दिनांक 23 मे रोजी निवेदन देण्यात येणार आहे, तरी सकाळी ठीक 10.30 वाजता शिवस्मारक खानापूर येथे जनतेने बहुसंख्येने उपस्थित राहावे असे खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta