Wednesday , March 4 2026
Breaking News

भाजपच्या डॉ. सरनोबत यांच्याकडून खानापूर वारकरीना वस्त्राचे वाटप

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : श्री क्षेत्र पंढरपूर येथील आषाढी वारीला खानापूर तालुक्यातुन अनेक वारकरी पंढरपूरला रवाना होतात.
यंदाच्या आषाढी वारीला पंढरपूरला जाणाऱ्या हभप वारकऱ्यांना भाजपच्या नेत्या व खानापूर भाजप महिला प्रमुख सौ. डाॅ. सोनाली सरनोबत यांच्यावतीने विविध पोषाख वस्त्राचे वितरण पंढरपूरला हभप विठ्ठल पाटील (किरहलशी) यांच्याकडे सुपूर्द केले.
यावेळी रमेश पाटील गर्लगुंजी प्रसार प्रमुख, दयानंद चोपडे, बसवराज कडेमणी, राहुल आळवणी, अर्जुन गावडे जांबोटी कार्यकर्ते, हणमंत टक्केकर ग्रा. पं. सदस्य, विठ्ठल निडगलकर, बाळेश चव्हणावर, नागो धर्माजी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी हभप विठ्ठल पाटील यांनी सौ. सोनाली सरनोबत यांचे आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *