Wednesday , March 4 2026
Breaking News

कणकुंबी, तळावडे शाळेत योग दिन साजरा

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : कणकुंबी (ता. खानापूर) येथील माऊली विद्यालयात तसेच तळावडे मराठी शाळेत राष्ट्रीय योग दिनाचे औचित्यसाधुन योग दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला खानापूर तालुका आम आदमीचे तालुका अध्यक्ष तसेच विश्व भारती क्रीडा संकुलन जांबोटी विभाग प्रमुख भैरू पाटील, अनिल देसाई एक्स आर्मी, विश्व भारती क्रीडा संकुलन खानापूर तालुका प्रमुख, गीता देसाई फुटबॉल कोच, मुख्याध्यापक सुनील चिगुळकर आदी उपस्थित होते.
यावेळी सकाळी सरस्वती पूजन करून योग दिनाची सुरूवात करण्यात आली.

यावेळी मुख्याध्यापक सुनिल चिगुळकर यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी योगाचे विविध प्रकार करून दाखविले. योग अभ्यास हा शरीराला किती फायदेशीर याची माहिती विद्यार्थी वर्गाला मिळाली.
यावेळी बोलताना खानापूर तालुका आम आदमीचे अध्यक्ष भैरू पाटील बोलताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी लहान पणापासुन योगा अभ्यास केला. विद्यार्थ्यांचे शरीर सदृढ राहील. एवढेच नव्हे तर योगा केलेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगला होता, मन प्रसन्न राहते. त्यामुळे परीक्षेत यश संपादन करण्यासाठी खुप मदत होते. म्हणून प्रत्येक योगाचा अभ्यास करावा.
राष्ट्रीय योग दिनाचे औचित्यसाधुन सर्वानीच योगात सहभाग दर्शविला होता.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मुख्याध्यापक सुनिल चिगुळकर यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *