खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील फुलेवाडी-डुक्करवाडीत क्राॅफ्टस कौन्सिल ऑफ बेंगलोर यांच्यावतीने १५ दिवसाचे मार्गदर्शन शिबीर नुकताच पार पडले. त्याचा समारोप समारंभ बुधवारी दि. २२ रोजी आयोजित करण्यात आला.
या १५ दिवसाच्या कुंभार कला शिबीरात उत्तम आधुनिक मातीपासून वेगवेगळ्या कलाकृती, वाल पीस, वेगवेगळ्या प्रकारचे पाॅडस् तयार करण्यात आले.
या शिबीराला क्राफ्ट कौन्सिल ऑफ बंगलोरचे चेअरमन मंगला नरसिंहन, श्री. फारूख, श्रीमती रेवती, आदी मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जीएसएस व आरपीडी काॅलेजचे चेअरमन शरद वालावालकर आदी उपस्थित होते.
शरद वालावालकर यांनी कुंभार कलाकार पुंडलिक कुंभार यांना कुंभार कार्यशाळेला आधुनिक पध्दतीची तसेच जळावू लाकुड कमी लागणारे मातीच्या वस्तू भाजण्यासाठी भट्टी देऊ केली. त्याबद्दल चेअरमन शरद वालावालकर यांचा पुंडलिक कुंभार यांच्यावतीने शाल श्रीफळ, पुष्पहार तसेच गणेशाची मुर्ती देऊन त्याचा सन्मान करण्यात आला. तसेच मार्गदर्शक मास्टर उलासकर यांचा ही शाल, श्रीफळ भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला खानापूर सीयूपीआय सेंटरचे प्राचार्य विजेंद्र सिंग, प्रा. प्रभाकर, प्रा. नागेश गोवर्धन, मधुकर कुंभार, आदी उपस्थित होते.
बोलताना चेअरमन मंगला नरसिंहन म्हणाल्या की, कुंभार कलाकाराचे आर्ट पाहुन फुलेवाडी- डुक्करवाडी गावचे नाव भविष्यात भारतामध्ये अधुनिक टेराकोटा कलाकाराचे गाव म्हणून ओळखले जाणार आहे. यासाठी आपले सहकार्य राहिल असे सांगितले.
खानापूर सीयूपीआय सेंटरचे प्राचार्य विजेंद्र सिंग यांनी आपल्या सेंटर पेक्षा याठिकाणीअधिक कला कृती पाहायला मिळते. याचे सगळे श्रेय पुंडलिक कुंभार यांना द्यावे लागतील, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार उलासकर यांनी मानले.
Check Also
खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती
Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …