खानापूर : मराठी भाषिकांना परिपत्रके मराठीमध्ये मिळावीत यासाठी मध्यवर्ती समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या महामोर्चाची जनजागृती हलगा या गावी भर पावसामध्ये करण्यात आली व ‘एक सीमावासीय लाख सीमावासीय’ घोषणा देऊन परिसर दणाणून सोडण्यात हलगा येथील नागरिक रोजगारासाठी गेले असता कलमेश्वर मंदिर येथे भर पावसामध्ये महामोर्चाची जागृती पत्रके वाटून हलगा गावातील नागरिकांना महामोर्चामध्ये मोठ्या संख्येने भाग घेण्याचे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी बोलताना केले. तसेच धनंजय पाटील यांनीसुद्धा रेशन कार्ड आधार कार्ड व सातबारा उताऱ्यावर मराठीला भाषेला प्राधान्य मिळवून देण्यासाठी रस्त्यावरची लढाई मोर्चाच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आली आहे तरी या मोर्चामध्ये बहुसंख्येने उपस्थित राहून यशस्वी करावा असे आवाहन करण्यात आले. तसेच सीमातपस्वी मसनु पाटील यांचे नातू रणजीत पाटील यांनीसुद्धा सीमा लढ्याच्या प्रत्येक आंदोलनामध्ये गावातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता आजही असाच सहभाग घेऊन हा मोर्चा यशस्वी करण्याचा पाठिंबा व्यक्त करण्यात आला. यावेळी रोजगार निमित्त गेलेले नागरिक व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. तसेच समितीचे ज्येष्ठ नेते गोपाळ पाटील, युवा समितीचे किशोर हेब्बाळकर, पुंडलिक पाटील, विलास पाटील, राजू पाटील, राजाराम देसाई आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta