खानापूर (प्रतिनिधी) : गेल्या पंधरा दिवसापासून मुसळधार पावसाने खानापूर तालुक्यातील रस्त्याची दैना केली आहे. त्यामुळे रस्त्याची इतकी दुर्दशा झाले की रस्त्यावरून ये-जा करणे धोक्याचे झाले. असा प्रकार खानापूर तालुक्यातील तोराळी- आमटे मार्गावरील रस्त्याची नुकताच झालेल्या मुसळधार पावसाने दयनिय अवस्था झाली आहे.
अतिपावसाचा तसेच जंगल भाग म्हणून तालुक्याच्या पश्चिम भागातील रस्त्याची इतकी वाईट परिस्थिती झाली आहे. या पावसाने या रस्त्यावर चार पाच फूट खोल चर पडली आहे. चुकून दुचाकी वाहन या चरमध्ये गेली तर वाहन चालकाची काय अवस्था होईल याची कल्पना करणे शक्य नाही.
या रस्त्यावरून गावचे नागरिक नेहमीच ये-जा करताना दिसतात, मात्र या रस्त्याची दुरावस्था पाहुन नागरिक हैराण झाले आहेत.
या रस्त्याची दयनिय अवस्था पाहून संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून हेत आहे.
- प्रतिक्रिया
तोराळी-आमटे रस्त्यावर नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने चार ते पाच फूट चर पडली. त्यामुळे येथून दुचाकी, किव्हा सायकल स्वार जाताना चरीमध्ये गेला तर त्याची अवस्था काय होईल याची कल्पना करणे शक्य नाही.
तेव्हा संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन त्वरीत दुरूस्ती करावी.
-शेतकरी, तोराळी