आपचे तहसीलदारांना निवेदन; इतर खात्यातीलही असे प्रकार होणे नाही ही विनंती
खानापूर (विनायक कुंभार) : खानापूर, नंडगड आणि पारीश्वाड येथिल सरकारी रुग्णालयातील पाच डॉक्टर गेल्या बऱ्याच महिन्यापासून डेप्युटेशनवर आहेत, डॉक्टरांची कमतरता असून देखील नियमबाह्य पद्धतीनं ते गैरहजर आहेत त्यांना त्वरित सेवेत हजर होण्यासाठी नोटीस द्यावे, अशा मागणीचे निवेदन आपच्या वतीने उपतहसिलदार के. वाय. बिद्री यांना देण्यात आले.
निवेदनात, खानापूर येथील दोन तज्ञ महिला डॉक्टर, नंदगड येथील २ डॉक्टर तसेच पारीश्वाड येथील एका फार्मसिस्ट डेप्युटेशनवर आहे. तालुक्याची लोकसंख्या पाहता तालुका हॉस्पिटलमध्ये सर्व तज्ञ डॉक्टरांची आवश्यकता असते. दुर्गम भागातील सर्व सामान्य जनतेला याची मोठी मदत होते. असे असताना देखील तालुका आरोग्याधिकाऱ्यानी त्या डॉक्टरांना मोकळीक का दिली आहे. परिणामी रुग्णांचे हाल होत आहे. त्याकरीता त्या डॉक्टरांना त्वरित त्यांच्या नियुक्तीच्या जागी रुजू होण्याचे आदेश करावे, तसेच इतही खात्यातील अधिकारी आणि कर्मचारी असा प्रकार करत असतील तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष भैरू पाटील, शहर अध्यक्ष शिवाजी गुंजिकर, गोपळ गुरव, सागर देसाई, महादेव कवळेकर, रमेश देसाई, रमेश कौंदलकर आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta