बेळगाव : हलशी येथील छत्रपती शिवाजी विद्या मंदिर हायस्कुल येथील मुख्याध्यापक बी. आर. बुवाजी ३६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर तर बडकू गुरव हे ४४ वर्षांच्या प्रदीप सेवेनंतर निवृत्त झाले आहेत. त्याबाबत त्यांचा शाळा सुधारणा कमिटी व मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्यावतीने बुधवारी बुवाजी व गुरव यांचा सत्कार करण्यात आला.
शाळेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव एम. वाय. बेळगावकर होते. तर प्रमुख पाहुणे सहसचिव बी. डी. कुडची, संचालक जे. यु. घाडी, शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष नागाप्पा देसाई होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व फोटो पूजन करण्यात आले. शाळेच्या विद्यार्थीनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले.
यावेळी बेळगावकर यांनी, बुवाजी यांनी गेली अनेक वर्षे शाळेची धुरा अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळली तसेच ते विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जात होते. शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान देण्याबरोबरच व्यावसायिक आणि इतर प्रकारचे ज्ञान उपलब्ध करून देणे गरजेचे असून सध्याचे दिवस कठीण आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक शिक्षकांची जबाबदारी वाढली असून सर्वांनी तंत्रस्नेही बनले पाहिजे, असे मत व्यक्त केले.
मुख्याध्यापक किरण देसाई यांनी प्रास्ताविक करताना बडकू गुरव व बुवाजी यांच्या कार्याचा आढावा घेतला. सूत्रसंचालन प्रियांका काकतकर यांनी केले.
यावेळी शाळा सुधारणा कमिटीचे सदस्य आनंद गुरव, पांडुरंग फौंडेकर, अर्जुन देसाई, चंद्रकांत देसाई, मल्लू पाटील, परशराम अंग्रोळकर, गणपती देसाई, नारायण पाटील, भाऊराव पाटील, गणपती पाटील, नारायण पाटील, आप्पाजी गावडा, तुकाराम हलसकर, संजय कामती, वैराळ भोसले, सहशिक्षक शंकर पाटील, सुदन देसाई, भाग्यश्री दळवी यासह शिक्षकेतर कर्मचारी व इतर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta