Thursday , April 17 2025
Breaking News

तालुक्याच्या प्रत्येक ग्रा. पं.तीत होणार कचरा डेपोचे आयोजन

Spread the love

खानापूर (सुहास पाटील याजकडून) : खानापूर तालुक्यात एकूण ५१ ग्राम पंचायती कार्यरत आहेत. त्यापैकी ३८ ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील ३ एकर जमिनीत हा कचरा डेपोचे आयोजन करण्यात येणार आहे.
यापैकी नंदगड ग्राम पंचायतीने कचरा डेपो कामाचा शुभारंभ केला असून याठिकाणच्या कचरा डेपोत गावातील प्लॅस्टिक पिशव्या, प्लॅस्टिक बाॅटल, कचरा असा वेगळा केला जातो. याची विभागणी करून तो स्वतंत्र पध्दतीने विभागुन तो परत पाठविला जातो.
ओला कचरा हा जमवून त्यापासून फायदा घेण्यात येणार आहे.
शेडचे आयेजन
प्रत्येक ग्राम पंचायतीच्या तीन एकर जमिनीत ९० फूट बाय ६० फूट जागेवर शेडचे आयोजन करण्यात येणार आहे. या शेडमध्ये सर्व प्रकारची मांडणी करण्यात येणार आहे.

  • पाच माणसाना काम
    कचरा डेपो उभारणीने प्रत्येक ग्राम पंचातीतील पाच माणसाना काम मिळणार आहे. एक अटो ड्रायव्हर व चार माणसाना दिवसभर काम त्यामुळे पाच कुंटूंबाना आर्थिक मदत होईल.
  • ग्राम पंचायतीकडून बकेट
    तालुक्यातील प्रत्येक ग्राम पंचायतीच्या हद्दीतील कचरा बाहेर जाण्यासाठी गावातील प्रत्येक कुंटूंबाला दोन बकेट देण्यात येणार आहेत.
    यामध्ये एक बकेट लाल व दुसरे बकेट हिरवे असणार आहे.
    लाल बकेटमध्ये सुका कचरा ठेवायचा आहे. तर हिरव्या बकेटमध्ये ओला कचरा ठेवायचा आहे.
  • कचरा डेपो इमारती बांधकामाला सुरूवात
    तालुक्यात नंदगड ग्राम पंचायतीमध्ये कचरा डेपो कार्यरत चालू आहे.
    त्याचप्रमाणे बिडी, हलगा, पारिश्वाड, कर्तन बागेवाडी, बेकवाड, देवलती, गुंजी आदी ग्राम पंचायती कार्यक्षेत्रात बांधकाम सुरू करण्यात आले आहे.
  • तालुका पचायत अधिकाऱ्यांचे आवाहन
    तालुक्यातील ५१ ग्राम पंचायती कार्यक्षेत्रात कचरा डेपो पध्दत चालु राहणार आहे. याला कोणी ग्रामस्थानी विरोध केला. तर पोलिस बंदोबस्तात कचरा डेपो योजना राबविणार आहे
    – श्री. देवराज, तालुका पंचायत अधिकारी.

About Belgaum Varta

Check Also

गुंजी ग्राम पंचायतीची आमदार चन्नराज हट्टीहोळी यांच्याकडे मागणी

Spread the love  खानापूर : खानापूर तालुक्यातील गुंजी गावच्या मूलभूत समस्यांचे निवारण करण्यासंदर्भात ग्रामपंचायत अध्यक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *