बेळगाव (वार्ता) : हनमन्नावर गल्ली अनगोळ येथे गेल्या दोन-तीन वर्षापासून ३०-३५ वर्षीय अनोळखी महिला फिरत होती. तिला कुटुंबाचा आधार नव्हता. तेथील नागरिक तिला अन्न पाणी देऊन तिची भूक भागवत होते. पण हल्ली तिचे मानसिक संतुलन खूपच बिघडल्याने ती तेथील नागरिकांना शिवीगाळ करत होती व नग्नावस्थेत फिरत होती. येथील नागरिकांना, महिला व लहान मुलांना दुखापत करेल याची भीती होती. त्यावेळी त्यांनी पोलीस हेल्पलाईन ११२ शी संपर्क साधला असता शहापूर पोलीस स्टेशनच्या डब्ल्यू पी सी सुजाता वैलापुरकर या घटनास्थळी पोहोचल्या. त्या महिलेची विचारपूस केली. तिचे मानसिक संतुलन बिघडल्याने तिला उपचाराची गरज होती त्याकरिता सुजाता वैलापूरकर यांनी समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांच्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली व मदतीचा हात मागितला तेव्हा माधुरी जाधव आणि त्यांचे सहकारी गौतम कांबळे हे घटनास्थळी पोहोचून तेथील नागरिकांशी त्या महिलेबद्दल चौकशी केली असता तेथील नागरिकांनी सांगितले की, तिचे मानसिक संतुलन बिघडते व महिलांना, लहान मुलांना त्रास देते. त्यामुळे तिच्या पुढील उपचाराकरिता तिला योग्य ठिकाणी घेऊन जाण्याची माधुरी जाधव यांना विनंती केली. यावेळी गौतम कांबळे यांच्या ऑटोमधून त्या महिलेला सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. याकरिता तेथील नागरिकांनी माधुरी जाधव आणि गौतम कांबळे यांचे आभार मानले.
Check Also
प्रा. डॉ. प्रवीण ए. घोरपडे यांचा सत्कार
Spread the love बेळगाव : इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर इंडिया बेळगाव शाखेच्या वतीने ५७ वा अभियंता …