खानापूर : खानापूर पोलिसांनी अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा टिप्पर जप्त केल्याची घटना घडली आहे. बेळगाव तालुक्यातील देसूर गावातून चोर्ल्याकडे एका टिप्परमध्ये अवैधरित्या वाळूची वाहतूक केली जात होती. खानापूर पोलिसांनी विशिष्ट माहितीवरून छापा टाकून मालासह लॉरी जप्त केली. पोलिसांनी चालकाची चौकशी सुरू केली आहे. हा टिप्पर एसजे डेव्हलपरचा असून त्याचा क्रमांक केए-22-सी-1323 आहे. याप्रकरणी डिसीआयबीने कारवाई केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta