खानापूर : खानापूर तालुका मराठी सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या वतीने संघटनेचे ८५ वर्ष पूर्ण केलेल्या १६ सभासदांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष श्री. डी. एम. भोसले गुरुजी होते. प्रमुख पाहुणे म्हणून खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष श्री. व्ही. एम. बनोशी, सेवानिवृत्त प्रिन्सिपॉल ताराराणी ज्युनियर कॉलेज खानापूर, खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेचे उपाध्यक्ष राष्ट्रपती पदक विजेते श्री. आबासाहेब दळवी, माजी नगरसेवक विवेक गिरी, सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष श्री. व्ही. यू. देसाई, प्रमुख वक्ते संजय वाटुपकर, श्री. सुब्रमण्यम साहित्य अकादमी बिजगर्णीचे कार्याध्यक्ष, अकादमीचे एम. पी. गिरी, इत्यादी मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती. यावेळी संस्थेच्या सभासदांच्या गुणवंत नातींचे इयत्ता १०वी मध्ये ९०% वरील गुणी विद्यार्थिनींचा पुष्पगुच्छ आणि रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. कर्नाटक राज्यामध्ये मराठी विभागात इयत्ता १०वी मध्ये प्रथम क्रमांकाची मुलगी पहिली आल्याने कु. प्रनेशा परशराम चोपडे हीचाही रोख रक्कम देऊन येथोचीत सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. व्ही. एम. बनोशी, डी. एम. भोसले, मनोहर पाटील, एन. एल. पाटील, इत्यादी गुरुजनानी रोख रक्कम बक्षिसादाखल दिली. तसेच मनाली ज्ञानेश्वर पाटील नागुर्डे, अनुश्री शिरीषकुमार पाटील मुतगे, स्मिता परशराम पाटील खैरवाड, हर्षदा प्रमोद मुचंडीकर पिरनवाडी, प्राची महेश गुरव खानापूर, शर्वरी शिवाजी मयेकर माणिकवाडी, पूजा दत्तात्रय गणाचारी कारलगा या गुणी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे वयाची ८५ वर्षे पूर्ण केलेले ज्येष्ठ शिक्षक श्री. सातेरी गंगाराम गुरव जळगे, श्री. तुकाराम परशराम गावडा झुंजवाड, श्री. शिवाजी नारायण देसाई हलशीवाडी, श्री. मनोहर नारायण पाटील इदलहोंड, श्री. नारायण लक्ष्मण पाटील बेकवाड, श्री. रामा नागाप्पा पाटील दोड्डहोसूर, श्री. मारूती रवळू नंद्याळकर जळगे, श्री. मल्लाप्पा सिध्दाप्पा देसाई हलशीवाडी, श्री. नारायण रामा तारीहाळकर नंदगड, श्री. अर्जुन रामचंद्र कळ्ळेकर जांबोटी, श्री. कल्लाप्पा सातेरी नंदगडकर असोगा, इत्यादींचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात श्री. संभाजी बाबाजी पाटील गुरुजी यांच्या प्रार्थनेने झाली. प्रास्ताविक व स्वागत संस्थेचे पदाधिकारी श्री. टी. वाय. पाटील गुरुजी यांनी केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे पदाधिकारी जे. बी. पाटील, एन. एम. पाटील, जी. एल. हेब्बाळकर, आर. एच. पाटील, एन. जे. गुरव, गुरुदत्त देसाई, शामराव देसाई, एम. ए. खांबले, बाबूराव पाटील, मोहन घाडी आदी सेवानिवृत्त शिक्षक, सत्कारमुर्तींचे कुटुंबीय बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी आबासाहेब दळवी, एन. एल. पाटील, व्ही. एम. बनोशी, विवेक गिरी, प्रमुख वक्ते संजय वाटुपकर इत्यादींची भाषणे झाली. अध्यक्षीय भाषण डी. एम. भोसले गुरुजींनी केले, आभार प्रदर्शन श्री. बी. एन. पाटील यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta