खानापूर (विनायक कुंभार) : गर्लगुंजी येथील मधुकर टोपान्ना मेलगे यांच्या राहत्या घराची स्वयंपाक खोलीची भिंत कोसळून मोठं नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. संततधार पावसामुळे गर्लगुंजीत अनेक घरांची पडझड झाली आहे. काही किरकोळ नुकसान झाले आहे.
मेलगे यांचे कुटुंबीय शनिवारी सकाळी न्याहरी करून सर्वजण घराबाहेर पडले होते. त्यावेळी ही घटना घडली. तसेच विठोबा गल्लीतील नामदेव अर्जुन कुंभार यांच्यासुद्धा घराची भिंत कोसळून मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी तात्काळ पीडिओ, तलाठी, अभियंता यांनी पहाणी करून नुकसान भरपाई देण्याची ग्वाही दिली.
Belgaum Varta Belgaum Varta