खानापूर (प्रतिनिधी) : रस्ता नव्हे, केवळ चिखलच पसरला आहे. अशी परिस्थिती खानापूर तालुक्यातील खैरवाड गावच्या मुख्य रस्त्यावर नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.
गावापासुन रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यावरून दुचाकी वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर या रस्त्यावरून पायी चालत जाणे मुष्कील झाले आहे.
माजी आमदार कै. प्रल्हाद रेमाणी यांच्या काळात या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम झाले होते. मात्र त्यानंतर या रस्त्याकडे कुणाचेच लक्ष नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही रस्त्याची दुरावस्था झाली आणि रस्ता चिखलमय झाला. या रस्त्यावरून महिलांना तसेच शाळकरी मुलांना ये-जा करणे धोक्याचे झाले आहे.
- प्रतिक्रिया
खैरवाड गावच्या विद्यार्थी वर्गाला शाळेला चिखलातून ये-जा करणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. सकाळ, संध्याकाळ ये-जा करताना कपडे चिखलाने घाण होतात. त्यामुळे रोजच याचा त्रास होत आहे.
– शालेय विद्यार्थी
Belgaum Varta Belgaum Varta