खानापूर (प्रतिनिधी) : आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भिती समोर आली. या संदर्भात सावधगिरीचा इशारा घेण्यासाठी खानापूर सरकारी दवाखान्यात चर्चा झाली.
देशभरात कोरोनाच्या महामारीमुळे जनता हैराण झाली आहे. आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची दहशत जनतेला लागली आहे.
यासंदर्भात खानापूर तालुक्यातील जनतेला सतर्क राहण्यासाठी येथील सरकारी दवाखाणन्यात चर्चा करण्यात आली.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांच्याशी बोलताना तालुक्याचा डाटा तयार करून, एकूण अम्ब्युलन्स, ऑक्सिजन, सिलेंडर, लहान मुलांचे डाॅक्टर याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी बेळगाव, खानापूर ग्रामीणचे धनंजय जाधव, खानापूर तालुता भाजपचे तानाजी गोरल, तालुका सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी, संजीव गुरव, सुभाष देशपांडे, नंदकुमार निट्टूरकर, रोहित गुरव, पवन गायकवाड आदी उपस्थित होते.
- प्रतिक्रिया
खानापूर तालुक्यातील जनतेला तिसऱ्या लाटेची कल्पना असणे गरजेचे आहे. कोणीही गाफिल राहू नये. यासाठी अम्ब्यूलन्स, ऑक्सिजन, सिलेंडर, लहान मुलांचे डाॅक्टर या संदर्भात चर्चा करण्यात आली व संबंधित तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांना सुचना करण्यात आल्या.
– तानाजी गोरल, भाजप कार्यकर्ता
Belgaum Varta Belgaum Varta