खानापूर (प्रतिनिधी) : दहावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यातील व पहिली परीक्षा आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी ठेवून अभ्यास केला तर यश नक्कीच मिळते. यासाठी सतत अभ्यास करा, असे आवाहन खानापूर तालुका आम आदमी अध्यक्ष भैरू पाटील यांनी दहावीच्या परीक्षेत ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेतलेल्या ओलमणी येथील राजश्री शाहु हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना भेट वस्तू देऊन सत्कार प्रसंगी बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाची सुरूवात मुलीच्या ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. तर प्रास्ताविक मुख्याध्यापक सी. एस. कदम यानी केले. उपस्थितांचे स्वागत ए. जे. सावंत यानी केले.
यावेळी व्यासपीठावर जांबोटी को-ऑप. सोसायटीचे चेअरमन विलास बेळगावकर, रमेश गावडे, मुख्याध्यापक चंद्रकांत कदम, पत्रकार हणमंत जगताप, कंचापा काजुनेकर व श्री. गावकर आदी उपस्थित होत.
विलास बेळगांकर, पत्रकार हणमंत जगताप आदिंनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. जे. सावंत यानी केले. तर आभार पत्रकार हणमंत जगताप यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta