खानापूर (प्रतिनिधी) : मेरडा (ता. खानापूर) येथील जनसेवक क्रीडा संघाच्या वतीने आयोजित पुरूष महिला गटाच्या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक के. के. पाटील होते.
तर व्यासपीठावर गोव्याचे डीएसपी सी. एल. पाटील, ग्राम पंचायत सदस्य पांडुरंग पाटील, भाजप नेते विठ्ठल हलगेकर, तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, माजी आमदार दिगंबर पाटील, यशवंत बिर्जे, मुरलीधर पाटील, धनश्री सरदेसाई, सावित्री मादार, माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई, रफिक हलशीकर, प्रवीण पाटील, सुहास पाटील, विठ्ठल गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व विविध देवदेवतांच्या फोटोचे पुजन करण्यात आले. तसेच पाहुण्याच्या हस्ते फित कापून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार ए. एल. पाटील यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta