खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरासह तालुक्यातील शेतकरी बांधवाना अलिकडे जनावरांना नविन लम्पी रोगाची लक्षणे दिसत आहेत. लम्पी रोग सांसर्गिक रोग आहे. हा रोग झपाट्याने फैलावत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात लम्पी रोगाने थैमान घातले असल्याने अनेक जनावरे दगावण्याची शक्यता येत आहे.
त्यासाठी शेतकरी वर्गाने आपल्या जनावराची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. तरच लम्पी रोगावर नियंत्रण मिळवू शकतो. यासाठी खानापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील यानी शेतकरीवर्गाला आवाहन केले आहे.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, गोठा स्वच्छ ठेवा, गोठ्यात डास माश्या होऊ देऊ नका. सकाळ संध्याकाळ कडूनिंबाच्या पाल्याची धुरी द्या. गोठ्यात जाणाऱ्या व्यक्तीनी कायम स्वच्छता बाळगण्याबरोबर रोगाचा फैलाव होणार नाही. याची काळजी घ्या.
जर जनावरांना ताप, शरीरावर गाठी, चारा खात नसतील तर जनावराल बाजुला बाधुन ताबडतोब पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कल्पना द्या असे सांगितले.
Check Also
खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती
Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …