Sunday , July 26 2026
Breaking News

नेताजी सोसायटीच्या वतीने ज्येष्ठ संचालक व मान्यवर व्यक्तींचा सत्कार

Spread the love

 

येळ्ळूर : नेताजी युवा संघटना संचलित नेताजी मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीच्या वतीने संस्थेच्या ज्येष्ठ संचालकांचा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवर व्यक्तींचा सत्कार समारंभ नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेताजी सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील हे होते. प्रारंभी ज्येष्ठ संचालक गणपती हट्टीकर, भोमानी छत्र्यांन्नावर, परशराम गिंडे, रवींद्र गिंडे, के. एन. पाटील व अभियंते हणमंत कुगजी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर लँड डेव्हलपर व बिल्डर तसेच सामाजिक कार्यकर्ते श्रीधर खन्नूकर यांच्या हस्ते शिव पुतळ्याचे पूजन करण्यात आले. तर ज्येष्ठ संचालक के. एन. पाटील यांनी गणेश प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमाची सुरुवात अथर्व पाटील या विद्यार्थ्याने गायीलेल्या अथर्वशीर्ष पटणाने झाली. प्रस्ताविक सोसायटीचे संचालक प्रा. सी. एम. गोरल यांनी केले. पाहुण्यांचा परिचय संचालक संजय मजूकर यांनी करून दिला. यानंतर संस्थेच्या वतीने ज्येष्ठ संचालक गणपती हट्टीकर व सौ शकुंतला हट्टीकर, भोमाणी छत्र्यांन्नावर व सुनीता छत्र्यान्नावर, परशराम गिंडे व अनुसया गिंडे, रवींद्र गिंडे व सुजाता गिंडे, के. एन. पाटील व पद्मा पाटील यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर गोर गरीब व वंचिता साठी कार्य करणारे अशादीप सोशल वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष अभियंते हणमंत कुगजी व त्यांच्या पत्नी उज्वला कुगजी यांचाही सामाजिक कार्याबद्दल शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते श्रीधर खन्नुकर यांचाही संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना चेअरमन डी. जी. पाटील म्हणाले, संस्थेच्या ज्येष्ठ संचालकांनी व्यवस्थित कार्य केल्यामुळेच संस्था आज दिमाखात उभी आहे. व दिवसेंदिवस संस्था प्रगती करीत आहे. त्यांनी ज्येष्ठ संचालकांच्या कार्याचा यावेळी आढावा घेतला. सत्कारबद्दल अभियंते हणमंत कुगजी व के. एन. पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सूत्रसंचालन प्रा. सी. एम. गोरल यांनी केले. तर संचालक भरतकुमार मुरकुटे यांनी आभार मानले. यावेळी सोसायटीचे सर्व संचालक सल्लागार कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *