खानापूर : खानापूर येथील सर्वोदय युवक मंडळ चन्नेवाडी यांच्या सौजन्याने 2000 सालच्या आतील वयोगटातील मुलांसाठी भव्य खुल्या कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. रविवार दिनांक 25 रोजी सकाळी दहा वाजता सदर कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पार पडला.
तसेच कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन ज्योतिराव पाटील, प्रकाश पाटील, पांडुरंग पाटील, धर्माजी पाटील, कल्लाप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राजाराम पाटील होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन शामराव पाटील व युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी किरण पाटील, ज्ञानेश्वर पाटील, परशराम, विठ्ठल पाटील व ह भ प हनुमंत पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
कबड्डी या खेळाला व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे. यासाठी सदर भव्य खुल्या कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. विविध संघांनी सदर स्पर्धेत सहभाग घेऊन स्पर्धेत सुयश मिळवले.
Belgaum Varta Belgaum Varta