खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील श्री भाग्योदय मल्टीपर्पज को सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा सोसायटीच्या सभागृहात नुकताच पार पडली.
सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन नगरसेवक आप्पया कोडोळी होते.
यावेळी सभेला माजी आमदार अरविंद पाटील, पोलिस काॅस्टेबल प्रकाश गाडीवड्डर, राजेश मडवाळकर आदी मान्यवराची उपस्थित होती.
तसेच सोसायटी व्हाईस चेअरमन दिपक कोडचवाडकर तसेच संचालक सदानंद देसाई, विठ्ठल हळदणकर, लक्ष्मण गुरव, श्रीकांत गावडे, नसीर धामणेकर, बालकृष्ण हलगेकर, राजशेखर कम्मार, डाॅ. शिवानंद किणगी, मोहनसिंग रजपूत, इराप्पा भंगी, रामचंद्र वड्डर, संचालिका शिल्पा भोसले, देविका गावडे आदी व्यासपिठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात स्वागतगीताने झाली. प्रास्ताविक स्वागत व्हा. चेअरमन दिपक कोडचवाडकर यांनी केले.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले.
सोसायटीला गेल्या आर्थिक वर्षात ८लाख ३७ हजार ५६९ इतका निव्वळ नफा झाला. तर संस्थेने एकूण उलाढाल १८,१८,१९,३३४ रूपये इतकी केली आहे. सभेचे औचित्य साधुन सोसायटीच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब कुटुंबाना रेशनचे वाटप केले. तर माजी आमदार अरविंद पाटील, पोलिस काॅस्टेबल प्रकाश गाडीवड्डर यांनी कुस्तीमध्ये सुवर्ण पदक मिळविल्याबद्दल तसेच राजेश मडवाळकर याने नीट परीक्षेत ६०५ वा क्रमांक मिळविल्याबद्दल यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी आमदार अरविंद पाटील म्हणाले की, सोसायटीच्या सभासदांनी विश्वास ठेवून कर्जाची परतफेड वेळेत केली व सोसायटीचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी सर्वानीच सहकार्य केले तर सोसायटीची भरभराट होण्यास वेळ लागत नाही.
यावेळी अहवाल वाचन स्नेहल भुजगुरव यांनी केले. तर आभार संचालक लक्ष्मण गुरव यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta