खानापूर (प्रतिनिधी) : पारिश्वाड (ता. खानापूर) येथील बसवेश्वर विविध उद्देशीय सौहार्द सहकारी सोसायटीची १२वी वार्षिक सभा नुकतीच पार पडली.
सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन सुभाष गुळशेट्टी होते.
सदाशिव देवरमनी यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
सभेची सुरूवात ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले.
यावेळी कार्यदर्शी रमेश गुडली यांनी अहवाल वाचन केले.
व यंदाच्या चालु आर्थिक वर्षात सोसायटीला १२ लाख, ७० हजार रूपयाचा निव्वळ नफा झाला. तर सोसायटीची एकूण उलाढाल सात कोटी इतकी आहे अशी माहिती दिली.
यावेळी भाजप नेते विठ्ठल हलगेकर, विश्वेश्वर एस, के. ए. एस, कुमुद पी. एस, रवी गडाद संकेश्वर, रश्मी शंकर जकाती, के. ए. एस. तहसीलदार, डॉ. सुरेश कुलकर्णी, निवृत्त शिक्षक सदाशिव जोगपगोळ, शांतच्या कलमठ, वीरप्पा चन्नगौडर, निवृत्त पशुवैद्यकीय अब्दुल रहमान गोरेखान, श्रीमती मल्लवा तळवार, बिष्ठापा बनोशी, गंगापा बागेवाडी आदीचा शाल, श्रीफळ, पुष्पहार व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सभेला उपाध्यक्ष सदाशिव देवरमनी, शिवानंद पाटील, संजीव नाशीपुडी, संभाजी कलाल, शिवाजी गुडली आदी उपस्थित होते.
सभेला सभासद, गावचे नागरिक उपस्थित होते.
शेवटी आभार लक्ष्मण सुमारे यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta