Sunday , September 20 2026
Breaking News

पंडित कैवल्यकुमार गुरव यांना फ्रान्स विद्यापीठाची डाॅक्टरेट

Spread the love

 

संकेश्वर : किराणा घराण्याचा गायकीचा वारसा समथ॔पणे पुढे नेणारे पंडित कैवल्यकुमार गुरव यांना फ्रान्समधील सोरेबाॅन विद्यापीठाने डाॅक्टरेट पदवीने सन्मानित केले.
सोरेबाॅन विद्यापीठाला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. जागतिक दर्जाच्या ञ असणारे हे विद्यापीठ आहे. पंडित कैवल्यकुमार गुरव यांनी शास्त्रीय गायनातील ‘रियाज’ यावर केलेल्या विशेष संशोधनाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू थाॅमस प्रेड यांच्या हस्ते पंडित कैवल्यकुमार यांना एका शानदार समारंभात गौरविण्यात आले. शास्त्रीय गायनसाठी गौरविण्यात आलेले कैवल्यकुमार हे पहिले भारतीय शास्त्रीय गायक आहेत.
पंडित कैवल्यकुमार यांना यापूर्वी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा 200 हून अधिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शास्त्रीय गायनासाठी रोज 10-12 तास रियाज करावा लागतो, कैवल्यकुमार यांनी आपल्या संशोधनाच्या माध्यमातून तो चार -पाच तास कसा करता येईल यावर भर दिला आहे. जेणेकरून तरूण पिढी शास्त्रीय संगीत क्षेत्राकडे वळेल यावर त्यांचे खास संशोधन आहे.
गेली चार दशके संगीत सेवा करणारे कैवल्यकुमार हे धारवाडस्थित असून संकेश्वर येथील एल. के. खोत काॅलेज ऑफ कॉमर्सचे सेवा निवृत्त प्राचार्य व इंग्रजी साहित्याचे अभ्यासक प्रा. शाम गुरव यांचे भाचे आहेत.

About Belgaum Varta

Check Also

गणेशोत्सवासाठी यमकनमर्डी पोलिसांकडून गणेश मंडळाना मार्गदर्शक सूचना : पीएसआय आर. बी. पाटील

Spread the love  मंडप, मिरवणूक व विसर्जनावेळी नियमांचे पालन करण्याचे आवाहन दड्डी वार्ताहर.. आगामी गणेशोत्सवाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *