खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील शाहू नगरात दुर्गा माता पुजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला.
यावेळी श्री दुर्गा माताच्या आरतीला उपस्थित भाजपचे अध्यक्ष संजय कुबल, भाजपचे नेते व महालक्ष्मी साखर कारखान्याचे अध्यक्ष विठ्ठल हलगेकर, खानापूर भाजप मीडिया प्रमुख राजेंद्र रायका, सुनिल नायक, तसेच शाहूनगरमधील नागरिक दिलीप सोनटक्के आणि महिला वर्ग बहूसंख्येने उपस्थित होते.
प्रारंभी भटजी सुनिल नायक यांनी दुर्गा मातेची विधीवत पुजा करण्यात आली. तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर आरती कार्यक्रम पार पडला. उपस्थित भाविकांना तीर्थ प्रसाद देण्यात आला. सोहळ्याचे औचित्य रात्री मनोरंजनाचे कार्यक्रम पार पडले.
Belgaum Varta Belgaum Varta