खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या तालुकास्तरीय प्रतिभा कारंजी स्पर्धा येथील मराठा मंडळ हायस्कूल व ताराराणी हायस्कूलात नुकताच पार पडल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर नगरपंचायतीचे स्थायी समितीचे चेअरमन प्रकाश बैलुरकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी, सीडीपीओ रामकृष्ण मुर्ती के व्ही, तसेच बीईओ राजश्री कुडची, क्षेत्र समन्वय अधिकारी ए. आर. अबंगी, मुख्याध्यापक राहुल जाधव, मुख्याध्यापक पी. एन. मेलगे आदी उपस्थित होते
उपस्थित पाहुण्याचे स्वागत बीईओ राजश्री कुडची यांनी केले.
तर उपस्थित पाहुण्याच्याहस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले. तर स्पर्धाचे उद्घाटन नगरपंचायतीचे स्थायी समितीचे चेअरमन प्रकाश बैलुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राथमिक व माध्यमिक अशा दोन गटात प्रतिभा कारंजी स्पर्धा घेण्यात आल्या.
यावेळी शेकडो विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कन्नड शिक्षक राजकुमार यांनी केले. तर आभार श्री. कम्मार यांनी मानली.
Belgaum Varta Belgaum Varta